Best News Portal Development Company In India

समर्थ नागरी पतसंस्थेकडून सभासदांना ११ टक्के लाभांश; ९३ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा. ​तुळजापूर येथे २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार | लवकरच स्वमालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार!

समर्थ नागरी पतसंस्थेकडून सभासदांना ११ टक्के लाभांश; ९३ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा.
​तुळजापूर येथे २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार | लवकरच स्वमालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेस या आर्थिक वर्षात ९३ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, संस्थेच्या १०२४ सभासदांना ११ टक्के दराने लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी केली. तुळजापूर येथील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे आयोजित संस्थेच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते.
​सभेमध्ये संस्थेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. या प्रसंगी मुख्य पाहुणे म्हणून जिल्हा सहकार अधिकारी मधुकर जाधव उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संस्था, सभासदांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

​आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा-
​संस्थेचे सचिव सज्जन जाधव यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. संस्थेने विविध आर्थिक निकषांवर केलेली कामगिरी खालीलप्रमाणे:
​निव्वळ नफा: ९३ लाख ५० हजार रुपये
​भागभांडवल: १ कोटी ६२ लाख १५ हजार रुपये
​ठेवी: २५ कोटी रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल
​कर्ज वाटप: १८ कोटी ६६ लाख रुपये (लहान-मोठ्या उद्योगांसाठी)
​कर्ज वसुली प्रमाण: ९७%
​बँक गुंतवणूक: विविध बँकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ८ कोटी ३० लाख रुपये

​लेखापरीक्षण वर्ग: सतत ‘अ’ वर्ग-
​सुरक्षितता, विश्वासार्हता, पारदर्शकता आणि व्यावसायिकता या तत्त्वांवर काम केल्यामुळे सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे. तसेच एनपीए (NPA) व सीडी रेशो (CD Ratio) या निकषांचे तंतोतंत पालन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष नारायण नन्नवरे यांनी नमूद केले.

​स्वमालकीची भव्य इमारत लवकरच-
​तुळजापूर खुर्द येथे संस्थेची स्वमालकीची साडेतीन गुंठे जागा आहे. इमारत बांधकामासाठी १ कोटी १५ लाख रुपयांचा इमारत निधी जमा असून, लवकरच या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
​उपस्थित मान्यवर व परिश्रम

​सभेस व्हाईस चेअरमन संजय व्हटकर, संचालक श्रीकांत भोजने, रवींद्र ताटे, बालाजी डोंगरे, दीपक कुंभार, अनुराधा गायकवाड, श्रीकांत देशमाने, संतोष इंगळे, शरयू जाधव, ॲड. अंजली साबळे, ॲड. अजिंक्य नन्नवरे, प्रा. अभय देशमाने यांच्यासह बहुसंख्य सभासद, खातेदार व ठेवीदार उपस्थित होते.

​सभेच्या यशस्वीतेसाठी अभिजित म्हेत्रे, सुनील शेरेकर, प्रवीण मोरे, आदित्य व्हटकर, माधुरी जाधव, तानाजी फुलसुंदर, आशिष भोजने, जावेद शेख, भागवत गुंड, गणेश ठेले, श्रीनिवास मुळे, मधुकर साळवे व सुरज जगताप यांनी परिश्रम घेतले. सभेचे सूत्रसंचालन बालाजी डोंगरे यांनी केले, तर आभार ॲड. अंजली साबळे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india