Best News Portal Development Company In India

शिराढोण प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधा; तुळजापूर पंचायत समिती सभापतींकडे विविध मागण्यांचे निवेदन!

शिराढोण प्राथमिक शाळेच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधा; तुळजापूर पंचायत समिती सभापतींकडे विविध मागण्यांचे निवेदन!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
मौजे शिराढोण (ता. तुळजापूर) येथील प्राथमिक शाळेतील विविध प्रलंबित अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात, या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विठ्ठल यांनी तुळजापूर पंचायत समितीचे सभापती मा. विक्रमसिंह देशमुख यांना निवेदन सादर केले आहे.

​शाळेतील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मूलभूत सुविधा अत्यंत गरजेच्या असून, प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन खालील समस्या दूर कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​शौचालयांची दुरवस्था- मुला-मुलींच्या मुतारी व शौचालयांची स्थिती अत्यंत खराब झाली असून, यामुळे विशेषतः विद्यार्थिनींची मोठी कोंडी होत आहे व ही बाब अत्यंत गंभीर आहे.

​पेव्हर ब्लॉक बसवणे:- शाळेच्या आतील मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्याने विद्यार्थ्यांना झेंडावंदन व दैनंदिन प्रार्थनेदरम्यान अडचणी येत आहेत. यासाठी मैदानावर पेव्हर ब्लॉक बसवणे गरजेचे आहे.

​मुख्याध्यापक पदाची भरती- शाळेत रिक्त असलेले मुख्याध्यापक पद तात्काळ भरण्यात यावे.
​क्रीडा साहित्य उपलब्ध करणे: विद्यार्थ्यांच्या शारीरिक व क्रीडा विकासासाठी शाळेत क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे.

​शाळेची रंगरंगोटी- शाळा इमारतीची दुरुस्ती करून तिला आकर्षक रंगरंगोटी करण्यात यावी.
​शाळेतील या सर्व समस्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या व शैक्षणिक वातावरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याने पंचायत समिती प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी नम्र विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india