रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तुळजापूर तालुका व शहर बैठकीत महत्त्वाचे ठराव सर्वानुमते मंजूर!
ना. रामदासजी आठवले यांच्या ‘समता क्रांती मार्च’ चा दौरा आणि पक्षाच्या ६९ व्या वर्धापन दिनाचे दिमाखदार नियोजन.
तुळजापूर प्रतिनिधी:-
दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी तुळजापूर येथील बुद्ध विहार सभागृहात ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)’ पक्षाची तुळजापूर शहर व तालुका संयुक्त बैठक अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या बैठकीत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच आगामी महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि विविध महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
बैठकीतील मुख्य ठराव व निर्णय-
१. केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले यांच्या ‘समता क्रांती मार्च’ चे नियोजन-
येत्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री मा. नामदार रामदासजी आठवले यांच्या ‘समता जोडो मार्च’ च्या निमित्ताने तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याचे जंगी स्वागत व नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
२. पक्षाच्या ६९ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे नियोजन.
येत्या दि ० ३ ऑक्टोबर २०२६ रोजी पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन असून हा वर्धापन दिन तुळजापूर तालुका व शहरामध्ये मोठ्या उत्साहात, विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शन व नेतृत्व:
या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून रिपाइं (आठवले) चे महाराष्ट्र प्रोश जॉइंट सेक्रिरी राजाभाऊ ओहाळ,मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे हे होते तर बैठकीचे अध्यक्षस्थ आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांनी भूषवले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना राजा भाऊ ओहाळ यानी पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले व १६ ऑक्टोबरचा ‘समता क्रांती मार्च’ दौरा यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे निर्देश दिले.
प्रमुख उपस्थितांची नोंद-
या बैठकीस पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. सिद्धार्थ ओहाळ (जिल्हा सरचिटणीस)
मा. बाबासाहेब मस्के (जिल्हा कार्यध्यक्ष)
मा. एस के गायकवाड (जिल्हा सचिव)
मा. रोहन बनसोडे (युवा जिल्हाध्यक्ष)
मा. बाळासाहेब बनसोडे (जिल्हा उपाध्यक्ष). मा. धम्मशील कदम (जिल्हा युवक कार्याध्यक्ष)
मा. प्रताप कदम (जिल्हा उपाध्यक्ष)
मा. अशोक गायकवाड (जिल्हा संघटक)
मा. रफिक मणियार (युवा जिल्हा उपाध्यक्ष)
मा. अरुण लोखंडे (तुळजापूर तालुका अध्यक्ष)
मा. निरंजन पांडगळे (तालुका उपाध्यक्ष)
मा. सुरज सुखदेवे (तालुका सचिव). मा.युवक जिल्हा अध्यक्ष रणजित बनसोडे, मा.युवक जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल लष्करे, मा.युवक नेते अश्रुबा शितोळे
या बैठकीचे प्रास्ताविक आरपीआयचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव एस के गायकवाड यांनी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व बैठक शांततापूर्वक पार पाडण्यासाठी तुळजापूर शहराचे शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे यांनी चोख व्यवस्था केली. तसेच या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते महिला भगिनी, तरुणांना” समता क्रांती मार्च “मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.









