Best News Portal Development Company In India

विराट विश्वकर्मा संघाच्या वतीने विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन उत्साहात संपन्न झाले.

विराट विश्वकर्मा संघाच्या वतीने विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन उत्साहात संपन्न झाले

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

विराट विश्वकर्मा संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बुधवार, दिनांक २३ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भगवान विश्वकर्मा प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री. बापूरावजी (काका) पाटील साहेब तसेच कट्टी बसवेश्वर विरक्त मठ, कोथळी येथील मठाधिपती शरण बसव स्वामीजी उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री. लक्ष्मण सुतार गुरुजी होते. प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. परमेश्वर सुतार, आलूर, श्री. धनराज पांचाळ, उमरगा, श्री. संदीप पांचाळ, जिल्हा सचिव, श्री. बालाजी पांचाळ सर आणि श्री. चंद्रकांत पांचाळ सर उपस्थित होते.

यावेळी विराट विश्वकर्मा संघ, मुरूमचे अध्यक्ष श्री. गोविंद शिवनाथ महामुनी, उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण पांचाळ आणि सचिव श्री. परमेश्वर पांचाळ यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भगवान विश्वकर्मा यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी समाजातील कारागीर, सुतार, पांचाळ तसेच विविध कौशल्याधारित व्यवसाय करणाऱ्या बांधवांचे समाजाच्या विकासातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. उपस्थित समाजबांधवांनी भक्तिभावाने भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. दिलीप पांचाळ, श्री. सुधाकर सुतार, श्री. संजय सुतार, श्री. रामचंद्र महामुनी, श्री. शिवा सुतार, श्री. परमेश्वर आलूरकर, श्री. अंबादास सुतार, श्री. मल्लिनाथ सुतार, श्री. मोनाप्पा सुतार, श्री. विजय दीक्षित, श्री. श्रीशैल सुतार, श्री. कमलाकर सुतार, श्री. मोनेश्वर पांचाळ आणि श्री. भीमाशंकर महामुनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विराट विश्वकर्मा संघ, मुरूमचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमास समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेवटी उपस्थित सर्व समाज बांधवांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाने कार्यक्रमाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india