Best News Portal Development Company In India

रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या ‘समता क्रांती मार्च’ दौऱ्यात धाराशिव जिल्ह्यातील कार्यकार्यानी व आंबेडकर आनुयायानी मोठ्या संख्येने सभाग नोंदवावा : राजा भाऊ ओव्हाळ

रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या ‘समता क्रांती मार्च’ दौऱ्यात धाराशिव जिल्ह्यातील कार्यकार्यानी व आंबेडकर आनुयायानी मोठ्या संख्येने सभाग नोंदवावा : राजा भाऊ ओव्हाळ
———————————————————–

नळदुर्ग (एस.के. गायकवाड):
आरक्षणाच्या नावाखाली सध्या महाराष्ट्रामध्ये जाती-जातीमध्ये द्वेष भावना वाढत चालली असून संविधानिक दृष्ट्या दिलेले आरक्षण मान्य करून सर्व जाती धर्मामध्ये सामाजिक सलोखा निर्माण झाला पाहिजे सर्वत्र समता प्रस्थापित झाली पाहिजे या उद्देशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे सामाजिक न्याय व अधिकारता मंत्री भारत सरकार, नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि.१६ऑक्टोबर २o२६ रोजी तुळजापूर मार्गे धाराशिव येथे येणाऱ्या “समता क्रांती मार्च ” मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तमाम रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी, आंबेडकरी अनुयायाने माता भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून “समता क्रांती मार्चा” दौरा यशस्वी करावा असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश जॉइंट सेक्रेटरी राजा भाऊ ओव्हाळ यांनी तुळजापूर येथे बोलताना केले.

. दि.२५ सप्टेंबर २o२६ रोजी तुळजापूर येथील आनंद बुद्ध विहार सभागृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची तुळजापूर शहर व तालुका बैठकीचे आयोजन रिपाइं (आठवले) चे जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.या प्रसंगी राजा भाऊ ओव्हाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी भारतिय संविधानाच्या माध्यमातून दिलेला समता,स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय . हा विचार समोर ठेवून सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. या वेळी रिपाइं (आठवले ) चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे,जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब.आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प पूजन करून आभिवादन करण्यात आले.या बैठकीत पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासोबतच आगामी महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी दि.१६ ऑक्टोबर २०२६ तुळजापूर मार्गे धाराशिव येथे नामदार रामदासजी आठवले यांचा “समाता क्रांती मार्च ” हा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यानी बैठकीत केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइं (आठवले) चे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यानी केले तर सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन रिपाइं (आठवले) चे धाराशिव जिल्हा सचिव एस. के. गायकवाड यानी केले.
.
या प्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ उर्फ मुन्ना ओव्हाळ,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, प्रताम कदम, युवा जिल्हा अध्यक्ष रणजीत बनसोडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल लष्करे,युवा नेते आश्रुबा शितोळे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष धम्मशील कदम तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे, तालुका सचिन सुरेंद्र सुरवसे,तालुका संघटक सुरेश लोंढे, नगर सेवक मारुती खारवे,रिपाइं चे तुळजापूर शहराध्यक्ष वैजिनाथ पांडागळे,लहु घोडके,प्रदिप सिटसट, रामचंद्र लोंढे, अरविंद लोखंडे महादेव जेटीथोर,मारुती जेटीथोर,सिद्धेश्वर थोरात रतन हावळे,वैभव जानराव सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail