*येणेगुर येथे भारतीय बौध्द महासभा शाखेचे उदघाटन*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.२७) भारतीय बौध्द महासभा उमरगा तालुका अतर्गत बीएसआय २५ मिशन अंतर्गत ग्रामशाख्या ५६ च्या प्रमाणे दि. २६ रोजी येणेगुर येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे शाखा क्रमांक १२चे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रथम तथागत भगवान बुध्द आणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर त्यागमुर्ती माता रमाई याच्या प्रतिमाचे पुजन जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम,तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, जिल्हा संघटक सुधीर कांबळे ब्रह्मानंद गायकवाड विद्याताई कांबळे तालुका सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे,प्रा शिवराय अडसुळे, उषाताई गायकवाड,धीरज कांबळे,मिलिंद कांबळे, शिवाजी जाधव याच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शाखा फलकाचे उद्घाटन फीत कापून जिल्हाध्यक्ष कदम ताई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा भीमस्मरण भीम स्तुती बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना घेण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे हे होते तर प्रमुख पाहुणे सुधीर काबळे, ब्रम्हानद गायकवाड, प्रा. शिवराम आडसुळे,विद्याताई काबळे, सरचिटणीस सगीताताई सोनकाबळे, तुळजापूर चे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे, धिरज काबळे,, उषा गायकवाड, मिलीद काबळे शिवाजी जाधव दिलीप गायकवाड आदीची प्रमुख उपस्थिती होती.
उदघाटन प्रसगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांनी मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय समारोप प्रसगी बौलताना बौध्दाचार्य उमेश सुरवसे म्हाणाले की, बौध्द धम्मातील बुध्द बाबासाहेब यानी दिलेले पचशिल आचरणात आणुन आपले जिवन आपण यशस्वी करू शकतो त्या साठी पचशिलाचे पालण करावे आसे सागीतले. तर या वेळी सुधीर काबळे, ब्रम्हानद गायकवाड, सगीता सोनकाबळे, प्रा. शिवराम आडसुळे ज्ञानेश्वर बनसोडे यानी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी नुतुन पदाधिकारी याचा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा याच्या वतिने ग्राम शाखा अध्यक्ष अरुणा कांबळे कोषाध्यक्ष शिलाबाई मोरे सरचिटणीस तीन सुरवसे, सुनंदा सुरवसे पप्पू सुरवसे नारायण सुरवसे आशाताई सुरवसे अमोल सुरवसे प्रशांत साखरे दिलीप गायकवाड बाळासाहेब गायकवाड राघोबा गायकवाड कल्पना कांबळे कविता सुरवसे धनराज गायकवाड संदेश बोडरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुषमा सुरवसे वर्षा गायकवाड लक्ष्मी बनसोडे लक्ष्मी गायकवाड रेखा गायकवाड भागुबाई साखरे तानाजी कांबळे डॉ.रमेश गायकवाड सत्कार करण्यात आला.
यावेळी सूत्रसंचालन व प्रस्तावना राघोबा गायकवाड यांनी केले तर अध्यक्षीय समारोप तालुकाध्यक्ष बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी केला.







