Best News Portal Development Company In India

शासनाच्या फसव्या जीआरविरोधात धाराशिवमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक; तहसील कार्यालयासमोर ‘लबाडांचे आवतन जाहीर होळी’ आंदोलन!

शासनाच्या फसव्या जीआरविरोधात धाराशिवमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक; तहसील कार्यालयासमोर ‘लबाडांचे आवतन जाहीर होळी’ आंदोलन!

तुळजापूर प्रतिनिधी:-
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागाची केवळ पाहणी करून काढलेल्या फसव्या शासन निर्णयाच्या (जीआर) विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष धाराशिवमध्ये चांगलाच आक्रमक झाला आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या या सरकारी आदेशाचा तीव्र निषेध करण्यासाठी पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ‘लबाडांचे आवतन जाहीर होळी’ आंदोलन करण्यात आले.

सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता धाराशिव तहसील कार्यालयासमोर हे भव्य आंदोलन पार पडले आहे. राज्य शासनाने घोषित केलेला दुष्काळाचा आदेश हा केवळ कागदी घोडे नाचवणारा आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप पक्ष संघटनेने केला आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पुढाकार-
या आंदोलनाच्या आयोजनात व नेतृत्वात धाराशिव तालुक्यातील खालील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे.
राकेश सूर्यवंशी (तालुका प्रमुख, धाराशिव)
विकास जाधव (युवाप्रमुख संघटक, तालुका)
विनोद गायकवाड (पदवीधर समन्वयक, तालुका धाराशिव) प्रभाकर पाटील

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा तीव्र करणार
“दुष्काळामुळे होरपळणाऱ्या बळीराजाला तातडीने आर्थिक मदत, पीकविमा आणि कर्जमुक्ती देण्याऐवजी शासन केवळ जीआर काढून वेळकाढूपणा करत आहे. या फसव्या जीआरची जाहीर होळी करून आम्ही सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवणार आहोत,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

याप्रसंगी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आणि शिवसैनिक या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काळात अधिक प्रभावी आंदोलन करण्यासाठी तरुण शिवसैनिकांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात संघटित व्हावे असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail