माकणी येथे संत मारुती महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विधान परिषदेत आमदार बसवराज पाटील यांची भेट.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.२८)लोहारा तालुक्यातील माकणी येथे संत मारुती महाराज यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा वाचन सोहळ्याला विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील हे उपस्थित होते.
या पवित्र धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने संत मारुती महाराजांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी दर्शन घेतले. तसेच ह.भ.प. महेश महाराज यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावात निर्माण झालेले भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण मनाला समाधान व सकारात्मक ऊर्जा देणारे होते.
यावेळी उपस्थित भाविक, ग्रामस्थ आणि आयोजकांशी आ. पाटील यांनी संवाद साधून या धार्मिक सोहळ्याच्या आयोजनाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. संतांच्या विचारांचा आणि अध्यात्मिक परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य अशा धार्मिक कार्यक्रमांतून सातत्याने होत राहावे, अशी भावना आ. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी शरणप्पा पत्रिके, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, दीपक मुळे, अँड. विश्वनाथ पत्रिके, दिलीप पवार, कडले गुरुजी, नागनाथ पत्रिके, नागोराव पाटील, अशोकराव साठे, अशोक मल्लाडे, निखिल पत्रिके, विवेकानंद पाटील, श्री. प्रभुराज पत्रिके, किशोर हुडगे, डॉ. गिरीष पत्रिके यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







