केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या बालेकिल्ल्यात राजू शेट्टींचा एल्गार! हुबळीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भव्य धरणे आंदोलन!
मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन राजू शेट्टींना स्वतः उपस्थित राहून आई जगदंबेचा जागरण गोंधळ घालून दिल्या शुभेच्छा.
तुळजापूर प्रतिनिधी;-
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि हक्काच्या लढ्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकातील हुबळी-धारवाड शहरात भव्य धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या मतदारसंघातच थेट आंदोलन सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात व प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
या आंदोलनाच्या प्रारंभी, आई तुळजाभवानीचा पावन आशीर्वाद घेऊन मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. हे धरणे आंदोलन पूर्णतः यशस्वी व्हावे आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळावा, अशी प्रार्थना त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी केली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची जोरदार उपस्थिती-
या आंदोलनात मराठवाड्यासह विविध भागांतून शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यावेळी आंदोलनाच्या स्थळी-
रवींद्र इंगळे (मराठवाडा विभागीय अध्यक्ष)
राजाभाऊ हाके
सतीश अण्णा साळुंके
धनाजी पेंदे
प्रतीक पाचंगे
गणेश भंडारे
यांच्यासह गोंधळी बंधू आणि शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांच्या शहरात सुरू झालेल्या या धरणे आंदोलनामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार राजू शेट्टी व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.







