धाराशिव पोलिसांचा मोठा दणका! सव्वादोन लाखांच्या अवैध दारूसह ऑटो रिक्षा जप्त; दोघे जाळ्यात!
तुळजापूर प्रतिनिधी:-
शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्रीविरुद्ध धडक कारवाई करत सूर्यकांत पेट्रोपंप परिसरात छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १५०० सीलबंद दारूच्या बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण २,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
कारवाईचा तपशील;-
मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास सूर्यकांत पेट्रोपंपाच्या रोडलगत छापा टाकला. त्याठिकाणी अवैध विक्रीच्या उद्देशाने दारूची साठवणूक व वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त केलेला मुद्देमाल-
देशी-विदेशी दारू: अंदाजे ६०,००० रुपये किमतीच्या १,५०० सीलबंद बाटल्या.
वाहनाची जप्ती: दारू वाहतुकीसाठी वापरलेली ऑटो रिक्षा (क्रमांक MH 25 AK 1283).
एकूण जप्त किंमत: २,१५,००० रुपये.
ताब्यात घेतलेले आरोपी:
१. राजू पाशा खान पठाण (वय ४१ वर्षे, रा. छायादीप लॉन्सच्या पाठीमागे, दत्तनगर, धाराशिव)
२. प्रमोद मच्छिंद्र गुजेरे (वय ३५ वर्षे, रा. पाथ्रूडवाडा, धाराशिव)
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.






