Best News Portal Development Company In India

धाराशिव: बिजनवाडी शिवारात दुष्काळी नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू; शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बांधावर पाहणी!

धाराशिव: बिजनवाडी शिवारात दुष्काळी नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू; शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बांधावर पाहणी!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आले आहे. बिजनवाडी शिवारात महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

​पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य-
​शासनाच्या सूचनेनुसार, नुकसानीची अचूक माहिती संकलित व्हावी आणि एकही बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहू नये यासाठी तलाठी व संबंधित शेतकऱ्याची प्रत्यक्ष शेतात उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शेतीची पाहणी पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या पंचनाम्यावर संबंधित शेतकऱ्याची स्वाक्षरी (सही) घेतली जात आहे, ज्यामुळे या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येत आहे.

​अधिकारी व शेतकऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती
​बिजनवाडी शिवारात पार पडलेल्या या पंचनामा प्रक्रियेवेळी ग्राम महसूल अधिकारी गुज्जर एन. आर., कृषी सहाय्यक धनके मॅडम आणि ग्राम विकास अधिकारी पारधे साहेब यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांच्या सद्यस्थितीची पाहणी केली.

​या पाहणीदरम्यान बिजनवाडी गावातील शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, संजय माने, शहाजी माने, भैरू निचळ, राम माने, पांडुरंग माने,शाहू माने, ज्ञानेश्वर माने, नरसु माने, रमेश पाटील यांच्यासह इतर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्यक्ष जागेवर येऊन योग्य पद्धतीने पंचनामा केला जात असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail