आपसिंगा येथे तुळजापूर पोलिसांची धाड; कल्याण मटका चालवणारा पोलिसांच्या जाळ्यात, मुद्देमालासह एकास अटक!
तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार आणि बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध आपली धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. आपसिंगा (ता. तुळजापूर) येथील नरेंद्र आर्य विद्यालय परिसरात चालणाऱ्या ‘कल्याण मटका’ जुगारावर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३:१० वाजेच्या सुमारास तुळजापूर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत असताना आपसिंगा येथील नरेंद्र आर्य विद्यालय परिसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ कारवाई केली.
या छाप्यादरम्यान आरोपी अविनाश महादेव रोकडे (वय ४५ वर्षे, रा. आपसिंगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा स्वतःच्या कब्जात कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि १,४८० रुपये रोख रक्कम बाळगून जुगार चालवत असताना आढळला.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.
सदरील कारवाईने परिसरातल्या मटका किंगयाप्रकरणी आरोपीविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.






