महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस भवनात अभिवादन; ३०० विद्यार्थ्यांचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग!
तुळजापूर प्रतिनिधी:-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची १२२ वी जयंती धाराशिव येथील जिल्हा काँग्रेस भवनात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व सेवा दलाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
गांधीजींच्या विचारांवर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा
विद्यार्थ्यांमध्ये महात्मा गांधी यांचे जीवनकार्य, सत्य व अहिंसेचे विचार आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास रुजविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बहुपर्यायी स्वरूपाच्या या स्पर्धेत गांधीजींचे जीवनकार्य आणि स्वातंत्र्यसंग्रामाशी संबंधित विविध प्रश्न विचारण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि पारितोषिक वितरण-
स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
विजेते पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक- दीक्षा वीरेश बिडवे, प्रतीक्षा वीरेश बिडवे व निशिगंधा नवनाथ गायकवाड
द्वितीय क्रमांक- प्रमोद समाधान चोरघडे, हर्षद धनाजी साळुंखे व शुभम बालाजी जगताप
तृतीय क्रमांक- हृषिका सतीश रेणके व गपाट पृथ्वीराज रावसाहेब
याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ३०० विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सेवा दलाचे विशेष परिश्रम व मान्यवरांची उपस्थिती
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सेवा दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, शिवाजी गायकवाड, विलास शाळू, जावेद काजी, अमर तागडे, जयसिंग पवार, संजय गजधने, बालाजी राठोड, हरिदास शिंदे, अभिमान पेठे, अशोक पेठे, श्यामसुंदर तोरकडे, मोईज सय्यद, पोपट शिंदे, तानाजी जाधव, मौलाना शौकत, शिवानंद तोडकर, बाळासाहेब बनसोडे, गणपत कांबळे, बसवराज पाटील, समीर साळवी, इस्माईल मुल्ला यांच्यासह काँग्रेस व सेवा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








