Best News Portal Development Company In India

संघर्षातून उद्योजकतेकडे; समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण करणारे गणेश विटकर!

संघर्षातून उद्योजकतेकडे; समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण करणारे गणेश विटकर!

व्यवसाय, इव्हेंट मॅनेजमेंट आणि सामाजिक कार्याचा अनोखा संगम.

पुणे : जिद्द, सातत्य आणि नव्या संधींचा शोध घेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे युवा उद्योजक गणेश रामदास विटकर हे व्यवसायासोबत सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट, डिजिटल मार्केटिंग आणि व्यवसाय प्रमोशनच्या माध्यमातून विविध उद्योजकांना व्यासपीठ देण्याचे काम ते करीत आहेत.

आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, स्वावलंबन, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि युवा उद्योजकतेला प्रोत्साहन देत समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला जात आहे. विविध पुरस्कार सोहळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.

“पुरस्कार हा केवळ सन्मान नसून पुढील कामाची प्रेरणा आहे; आणि व्यवसाय म्हणजे केवळ स्वतःची प्रगती नव्हे, तर इतरांसाठीही संधी निर्माण करणे,” या विचारातून गणेश विटकर यांची वाटचाल सुरू आहे. युवा पिढीने स्वावलंबी होऊन स्वतःच्या कर्तृत्वातून रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, हा संदेशही त्यांच्या उपक्रमातून दिला जात आहे. व्यवसायासोबत समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची त्यांची ही वाटचाल आगामी काळात अधिक व्यापक करण्याचा त्यांचा मानस आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india