Best News Portal Development Company In India

*भगवान बुद्धांनी ग्रहत्याग करून मानवी कर्तव्य पार पाडले -बौध्दाचार्य उमेश सुरवसे*

*भगवान बुद्धांनी ग्रहत्याग करून मानवी कर्तव्य पार पाडले -बौध्दाचार्य उमेश सुरवसे*

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

तथागत भगवान गौतम बुद्धांनी शाक्य (दि.३)आणि कोलीय यांच्यामधील रोहिणी नदीवरून होणाऱ्या युद्धाला थांबवण्यासाठी व मानवी कल्याणाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी भगवान बुद्धांनी युद्ध हा पर्याय नसल्याचे सांगितले आणि शक्य संघाकडून मिळणाऱ्या दंडाला वृद्ध आई-वडील यांचा विचार करून ग्रह त्याग करण्याचा निर्णय घेऊन मानवी कर्तव्य पार पाडल्याचे बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी उमरगा येथील पंचशील नगर येथील नालंदा बुद्ध विहार वर्षावास कार्यक्रम आयोजित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ वाचन कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना प्रतिपादन केले.

यावेळी सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेची पूजन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, तालुका सचिव मिलिंद कांबळे, सचिव धीरज कांबळे संघटक सुरज गायकवाड यांच्या हस्ते करून त्रिशरण पचशिल बुध्द पुजा बुध्द वदना धम्म वदना सघ वदना भिमस्मरण भिमस्तुती घेऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन आरोही व्हताळकर यांनी केले.

यावेळी पुढे बोलत असताना बौद्धाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की, तथागत भगवान बुध्दाचा आदर्श घेऊन जागतिक वृध्द दिना निमित्त मानवाच्या कल्याणासाठी कार्य करावे जेणे करून भगवान बुध्दाचा गृहत्याग हा जगाच्या कल्याणासाठी उपयोगात येईल. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून मागील पन्नास वर्षांमध्ये बौद्ध धम्म परिषद या परिसरामध्ये न झाल्यामुळे फार मोठे नुकसान झाल्याचे मत सुरवसे यांनी व्यक्त केले.

तसेच समता सैनिक दलाचे ५०० सैनिकांचे प्रशिक्षण शिबिर उमरगा शहरांमध्ये आयोजित करण्यात आले आहे त्यामध्ये सर्व इच्छुक सैनिकाने आपले नाव नोंदणी करावे असे आवाहन पचशिल नगर येथील नालदा बुध्द विहार येथे वर्षावास कार्यक्रम प्रसगी भगवान बुध्द आणी त्याचा धम्म या ग्रथ वाचना सह ठरवुन दिलेल्या ३२ विषयातील दि. १ आक्टोबर रोजीचा विषय जागतिक वृध्द दिन व मानवाचे कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन करताना सागीतले.

या वेळी आरोही व्हंताळकर
रमेश सोनकांबळे,अंजना भालेराव, त्रिशीला कांबळे, लक्ष्मी भालेराव, केशर व्हनताळकर, अशा व्हंताळकर, सुवर्णा भालेराव, सुवर्णा कांबळे, रेणुका सूर्यवंशी, अनुसया कांबळे,स्वरा कांबळे, संस्कृती सूर्यवंशी, वेदिका भाले, प्रणवी कांबळे, विवेक भाले, आदीजनाची उपस्थिती होती.तर कार्यक्रमाचे सुत्रसचालन धिरज काबळे यांनी केले तर आभार आरोही व्हताळकर यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india