Best News Portal Development Company In India

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड: धनंजय मुंडेंचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश!

धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड: धनंजय मुंडेंचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे साडू ॲड. रविंद्र नागरगोजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे १ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या राजकीय घडामोडीमुळे धाराशिव आणि लगतच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

​टिळक भवनात वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती-
महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲड. नागरगोजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार, रेहाना चिस्ती, भानुदास माळी, श्रीनिवास बिक्कड, धाराशिव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, ओबीसी प्रदेश काँग्रेस सचिव पांडुरंग कुंभार, प्रदेश सरचिटणीस मलंग शेख यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

​पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन-
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ॲड. रविंद्र नागरगोजे यांचे पक्षात स्वागत करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. काँग्रेस पक्षाची पुरोगामी विचारधारा, ध्येयधोरणे आणि लोककल्याणकारी विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सक्रिय काम करण्याचे आवाहन यावेळी सपकाळ यांनी केले.

​धाराशिवच्या राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष
धनंजय मुंडे यांच्याशी असलेले कौटुंबिक नाते आणि ॲड. रविंद्र नागरगोजे यांचा काँग्रेसमधील प्रवेश या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक व राज्यस्तरीय निवडणुकीच्या दृष्टीने या प्रवेशाचा धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या ताकदीवर आणि राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india