Best News Portal Development Company In India

तुळजापूर बायपासवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; कानेगावच्या बालाजी माळींचा अपघात, तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल!

तुळजापूर बायपासवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; कानेगावच्या बालाजी माळींचा अपघात, तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर-सोलापूर-लातूर बायपास रस्त्यावरील सिंधफळ शिवारात वाहनाच्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. बालाजी मारुती माळी (वय ५४, रा. कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव) असे या अपघातातील मयत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात निष्काळजी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मयत बालाजी माळी हे ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून (क्र. एमएच १३ ए.एल. ७०५८) जात होते. दरम्यान लातूर-सोलापूर-तुळजापूर बायपासवर रायखेल गावाकडे जाणाऱ्या पुलाजवळ, सिंधफळ शिवारातील विठ्ठल लोखंडे यांच्या शेताजवळ आले असता, वाहन क्र. एमएच १२ पीएन ९७९४ च्या चालकाने आपले वाहन हायगयीने व निष्काळजीपणे चालवून बालाजी माळी यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात बालाजी माळी हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.

​या प्रकरणी मयताचे मुलगा प्रदीप बालाजी माळी (वय ३२, रा. कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी २ ऑक्टोबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, तुळजापूर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा कलम १३४(अ), १८४ अन्वये गुन्हा नोंदवला असून अधिक तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india