Best News Portal Development Company In India

वागदरी येथे महात्मा बस्वेश्वर यांच्याअश्वारुढ पुतळ्याचे आमदार बसवराज पाटिल यांच्या उपस्थितीत थाटामाटात अनावरण सोहळा संपन्न.

वागदरी येथे महात्मा बस्वेश्वर यांच्याअश्वारुढ पुतळ्याचे आमदार बसवराज पाटिल यांच्या उपस्थितीत थाटामाटात अनावरण सोहळा संपन्न.

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

उमरगा तालुक्यातील वागदरी येथे संसदीय लोकशाहीच्या प्रणालीचे जनक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या चरणी आमदार पाटील नतमस्तक झालो .

या भव्य पुतळ्याच्या उभारणीसाठी पुढाकार घेणाऱ्या महात्मा बसवेश्वर पुतळा समितीचे, तसेच शमाधव पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा आमदार पाटिल यांनी व्यक्त केले.

या सोहळ्याला धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन,तथा मुरुम नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण भैय्या पाटील , काशिनाथ पाटील, दिलीप भालेराव, केशव पवार, हिराकांत पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप गरुड, प्रल्हाद काळे, रमेश चव्हाण, बसवराज कस्तुरे, धोंडीराम भोसले, सचिन पाटील, विक्रम मदने, रफिक तांबोळी, योगेश राठोड, सतीश पवार, भरत मारेकर,रुखमांनंद पवार, अनिल सगर, महेश माशाळकर, आकाश इंगळे, शंकर पाटील, संजय आमाशेट्टे, श्री सुशांत कोतवार यांच्यासह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail