आंतरशालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत तुकाराम मल्लिनाथ सोनटक्के यांचा प्रथम क्रमांक…..,
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड……..
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चे विद्यार्थीची चमकदार कामगिरी, लातूर येथे रविवारी (दि. ४) पार पडलेल्या आंतरशालेय विभागीय कुस्ती स्पर्धेत मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थि तुकाराम मल्लिनाथ सोनटक्के याने ७० किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक नारायण सोलंकर व सुजित शेळके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. याबदल प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथे त्याच्या सत्कार प्राचार्य उल्हास घुरघुरे यांच्या हस्ते करण्यात आला…
तुकाराम सोनटक्के यांच्या चमकदार यशाबद्दल नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम चे आधार स्तंभ व मार्गदर्शक विधान परिषद आमदार बसवराज पाटील साहेब, नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम अध्यक्ष बापुराव पाटील साहेब, नगर शिक्षण विकास मंडळ मुरूम सचिव शरण भैया बसवराज पाटील साहेब,प्राचार्य उल्हास घुरघुरे, उपप्राचार्य उमाकांत महामुनी, पर्यवेक्षक विवेकानंद परसाळगे,यांच्यासह सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.







