हर्ष कुंभार यांस डॉ. रत्नप्पा कुंभार लोकरत्न पुरस्काराने सन्मानित !
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
कोरेगांववाडी येथील नागनाथ कुंभार यांचे नातू हर्ष विजय कुंभार यांचा राज्य कुंभार संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय डॉ.रत्नप्पा लोकरत्न पुरस्कार देऊन मुंबई येथे सन्मानीत करण्यात आले.
कोरेगांववाडी येथील माजी सरपंच तथा अखिल भारतीय प्रजापती कुंभकर संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागनाथ कुंभार यांचे नातू हर्ष विजय कुंभार याने नुकत्याच चेनई येथे पार पडलेल्या जागतीक कराटे क्रिडा प्रकारात गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
हर्ष यांने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन मुंबई येथे देशभक्त पद्मश्री डॉ. रत्नप्पा कुंभार यांच्या ११७ व्या जयंत्ती उत्सव समितीच्या विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी काणाऱ्या समाज बांधवांसाठी लोकरत्न पुरस्कार सोहळा मुंबई येथील दादर माटुंगा सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला . या कार्यक्रमात हर्ष कुंभार यास लोकरत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील उद्योजक दत्ताजी रसाळकर , आखिल भारतीय प्रजापती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर.बी .के.प्रजापती , प्रजापती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागनाथ कुंभार , कर्नाटक बिदर येथील माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा , मल्लीकार्जुन कुंभार ,उत्सव समितीचे अध्यक्ष महेश सायकर ,रत्नप्पा कुंभार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा रत्नप्पा कुंभार यांच्या कन्या रजनीताई मगदूम , महानंदा कुंभार , ज्योतिताई कुंभार , विजय कुंभार , माजी सरपंच महादेव खटावकर , नामदेव कुंभार , भगवान कुंभार सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती.







