Best News Portal Development Company In India

धाराशिव: उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत ‘विजय चौक तरुण मंडळ’ प्रथम; काँग्रेसतर्फे विजेत्या मंडळांचा दिमाखदार गौरव!

धाराशिव: उत्कृष्ट गणेश मंडळ स्पर्धेत ‘विजय चौक तरुण मंडळ’ प्रथम; काँग्रेसतर्फे विजेत्या मंडळांचा दिमाखदार गौरव!

​धाराशिव शहरातून गवळी गल्ली व हिंगळजमाता मंडळांचा बाजी मारली; तर तालुका स्तरावर ढोकीचे कामगार गणेश मंडळ अव्वल

​तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी व धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कृष्ट गणेश मंडळ व गौरी सजावट स्पर्धेचा’ निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. धाराशिव येथील जिल्हा काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सन्मान सोहळ्यात विजेत्या तसेच सहभागी सर्व गणेश मंडळांचा रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

​जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, ज्येष्ठ नेते विश्वास आप्पा शिंदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत व प्रशांत पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मंडळांना ट्रॉफी, पक्षाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

​स्पर्धेचा अंतिम निकाल-
​धाराशिव शहर स्तर:
​प्रथम क्रमांक- विजय चौक तरुण गणेश मंडळ, धाराशिव.
​द्वितीय क्रमांक- श्री बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली.
​तृतीय क्रमांक- हिंगळजमाता गणेश मंडळ, धाराशिव.
​उत्तेजनार्थ- छत्रपती संभाजी चौक गणेश मंडळ आणि श्री समर्थ राजा गणेश मंडळ, धाराशिव
​तालुका स्तर-
​प्रथम क्रमांक- कामगार गणेश मंडळ, ढोकी
​द्वितीय क्रमांक- शिवभक्त गणेश मंडळ, कोंड
​तृतीय क्रमांक- साठे तरुण गणेश मंडळ, आंबेजवळगा.

​”गणेशोत्सव हा सामाजिक एकोप्याचे माध्यम ठरावा”
​या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी सर्व सहभागी व विजेत्या मंडळांचे अभिनंदन केले. “गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक उत्सव न राहता त्याद्वारे सामाजिक सलोखा, बांधिलकी आणि समाजोपयोगी कामे झाली पाहिजेत,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्यातही मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान गणेश मंडळांच्या अडचणी आणि मिरवणूक देखाव्यांबाबतही संवाद साधून माहिती जाणून घेण्यात आली.

​मान्यवरांची प्रमुख उपस्थिती-
​या दिमाखदार सोहळ्यास काँग्रेसचे अशोक बापू शेळके, अग्निवेश शिंदे, शिवाजी गायकवाड, शहाजी मुंढे, गोकुळ सुरवसे, हरिदास शिंदे, अंकुश पेठे, अविनाश रणखांब, दयानंद नागपुरे, अशोक बनसोडे, मोइब शेख, बाबा मोमीन, पोपट शिंदे, मौलाना शौकत, जुबेर शहा, बालाजी राठोड, ज्योतीराम निमसे, महावीर चव्हाण यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, गणेश मंडळांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india