Best News Portal Development Company In India

चारित्र्याच्या संशयावरून पतीने साखळी अन् दगडाने ठेचून केली पत्नीची हत्या; कळंब तालुक्यातील हासेगाव शिवारातील खळबळजनक घटना!

चारित्र्याच्या संशयावरून पतीने साखळी अन् दगडाने ठेचून केली पत्नीची हत्या; कळंब तालुक्यातील हासेगाव शिवारातील खळबळजनक घटना!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच आपल्या पत्नीची साखळी आणि दगडाने डोक्यात मारहाण करून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील हासेगाव शिवारात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी पतीविरोधात कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे (रा. पुनर्वसन सावरगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) याने दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास हासेगाव शिवारातील मानधने पेट्रोल पंपासमोरील शेतात ही घटना घडवली. आरोपीने आपली पत्नी मयत कोमल गणेश उर्फ विनायक टेकाळे यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांच्याशी वाद घातला. या संशयाच्या भरात आरोपीने साखळी व दगडाने कोमल यांच्या डोक्यात तीव्र प्रहार करून त्यांना जागीच ठार मारले.

​या घटनेप्रकरणी बंडू विश्वांभर पवार (वय ५१ वर्षे, रा. करंजकल्ला, ता. कळंब, जि. धाराशिव) यांनी दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी कळंब पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. सदरील घटनेने परिसरात खळबळ उडाली असून एक कुटुंब संपूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे.

दिलेल्या प्रथम खबरेवरून कळंब पोलिसांनी आरोपी गणेश उर्फ विनायक टेकाळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india