Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा मोठा निर्णय: नवरात्रोत्सवात सर्व ‘रेफरल दर्शन पास’ बंद; कुठे मिळणार सशुल्क पास? वाचा सविस्तर!

​श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा मोठा निर्णय: नवरात्रोत्सवात सर्व ‘रेफरल दर्शन पास’ बंद; कुठे मिळणार सशुल्क पास? वाचा सविस्तर!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
श्री तुळजाभवानी देवीच्या आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानाने भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी आणि व्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिनांक १० ऑक्टोबर २०२६ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यान श्री देवीजींच्या दर्शनासाठी सर्व ‘रेफरल देणगी दर्शन पास’ पूर्णपणे बंद राहणार आहेत.

​रेफरल पास बंद ठेवण्याचे मुख्य कारण
​१. भाविकांची गर्दी व सुलभ दर्शन: नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता सर्वसामान्य भक्तांना सुलभ व जलद दर्शन मिळावे.
२. आदर्श आचारसंहिता- सध्या छ. संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम २०२६ ची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने रेफरल पास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

​सशुल्क देणगी दर्शन पास कुठे मिळतील?
​भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने सशुल्क देणगी दर्शन पासची व्यवस्था केली आहे:
​३०० रुपयांचा पास- घाटशीळ पार्किंग येथे उपलब्ध करून दिला जाईल.
​१००० रुपयांचा पास-
प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावरून वितरीत केला जाईल.

​प्रशासनाचे आवाहन-
​या बदलांची नोंद सर्व महंत, पुजारी, सेवेधारी आणि देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांनी घ्यावी व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रगटनाद्वारे केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail