Best News Portal Development Company In India

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पुतळ्याचे दहन; धाराशिवमध्ये काँग्रेसचा धडक ‘आक्रोश मोर्चा’ ​निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध करत दुष्काळग्रस्तांना तातडीने मदतीची जोरदार मागणी!

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पुतळ्याचे दहन; धाराशिवमध्ये काँग्रेसचा धडक ‘आक्रोश मोर्चा’
​निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध करत दुष्काळग्रस्तांना तातडीने मदतीची जोरदार मागणी!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
निवडणूक आयोगाच्या कारभारातील कथित अनियमितता, मतदार यादीतील फेरफार आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी कळंब शहरात भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन शेतकरी व शेतमजुरांना तातडीने मदत देण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
​
​धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर आणि कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पासाहेब शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होऊन तहसील कार्यालयावर धडकळा. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’ आणि केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.

​दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना तातडीने भरपाई द्या!
​मोर्चानंतर तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात जिल्ह्यातील बिकट परिस्थितीवर लक्ष वेधण्यात आले.
​कोरडा दुष्काळ व पीक हानी- धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकतात सापडला आहे.
​शेपांराचा प्रश्न- शेतीकाम ठप्प झाल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

​शासनाकडे मागण्या- राज्य सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी. तसेच पिकांचे पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई लागू करावी.
​पारदर्शक निवडणूक प्रक्रिया- मतदार यादीतील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवावा.
​
​या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग कुंभार, दादासाहेब मुंडे, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, प्रा. खलील सर, धनंजय राऊत, अग्निवेश शिंदे, दौलतराव माने, बाळासाहेब गपाट, अनंतराव घोगरे, ज्योती सपाटे, पाशाभाई पठाण, पृथ्वीराज देशमुख, भूषण देशमुख, शशिकांत निरफळ, शफीउल्ला पठाण, विशाल शितोळे, सचिन गायकवाड, दिलीप वाघमारे, सुभाष वाघमारे, वसंत मडके, अशोक भातलवंडे, विलास करंजकर, शंकर करंजकर, प्रभाकर जाधव, विश्वंभर मैंदाड, वैभव काळे, राजेंद्र पाटील, राजेंद्र गिरी, बाबासाहेब शेळके, प्रताप पाटील, अजित शेळके, हरिदास शिंदे, अभिषेक बागल, राजेंद्र राऊत, महावीर चव्हाण, बिलाल काझी, सरफराज काझी, हरी कुंभार, मनोज शितोळे, सुदर्शन माने, रोहित कसबे, नारायण दशवंत, शिलानंद शिनगारे, अजिनाथ मोरे, रोहित करंजकर आणि इरफान पठाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india