Best News Portal Development Company In India

*दानशूरांच्या सहकार्यातून शाळेचा विकास प्रेरणादायी* अँड शितल चव्हाण .

*दानशूरांच्या सहकार्यातून शाळेचा विकास प्रेरणादायी*
अँड शितल चव्हाण .

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

*शाळेचे माजी विद्यार्थी *तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडून शाळेला एक लाखाची ठेव*
*गुणवंत विद्यार्थ्यांना 41 हजार रुपयाची बक्षिसे*
उमरगा : येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल मधील दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाप्रसंगी वाचन चळवळीचे जनक अँड शितल चव्हाण बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी व सोलापूर येथील प्रसिद्ध पत्रकार मंगेश देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त जेकेपूर वाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी प्रा. किरण सगर उमरगा रोटरीचे अध्यक्ष अनिल मदनसुरे विस्तार अधिकारी शीला मुदगडे केंद्रप्रमुख बबिता महानूर शितल जावळे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुजाता मोरे प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे उपस्थित होते. पुढे बोलताना अँड शितल चव्हाण म्हणाले की जिल्हा परिषद हायस्कूल ला दानशूर व्यक्तींची खूप मोठी परंपरा आहे. या प्रशालेतून अनेक गरीब विद्यार्थी समाजातील दानशूर व्यक्तींच्या पुढाकाराने व दत्तक घेऊन शिक्षण घेतल्याने आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत.मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या प्रयत्नातून समाजातील स्वंयसेवी संस्था रोटरी क्लब आणि उमरगा शहरातील दानशूर व्यक्ती तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून या शाळेतील शिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केलेला आहे‌.तर अँड शीतल चव्हाण यांनी केले.

शिक्षणासाठी गरिबी अडसर ठरू शकत नसल्याचे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी कठीण मेहनत करावी वाचन करावे.

म्हणजे समाजातील दानशूर व्यक्ती आपणास मदत करण्यास तयार आहेत. यावेळी शीला मुदगडे यांनी पण आपले विचार व्यक्त केले. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सकाळचे पत्रकार अविनाश काळे , हरिप्रसाद चांडक, रविराज बिराजदार शंकर सुरवसे गोपाळ आष्टे,रमेश होदलूरकर, प्रविण स्वामी, शकुंतला मोरे.शितल जावळे, डॉ प्रमोद बर्मा, प्रभावती जाधव, दिलीप पोतदार, प्रा.किरण सगर, गोपाळ आष्टे प्राध्यापक युसुफ मुल्ला मंगेश देशमुख, राम साळुंके विजय केशवशेट्टी, प्रदीप चालुक्य हरिप्रसाद चांडक शोभा टोणपे चार्टर्ड अकाउंटंट लक्ष्मीकांत शिंदे,अँड शितल चव्हाण , प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, सरिता उपासे, धनराज तेलंग,बशीर शेख, विद्यानंद सुत्रावे यांच्याकडून जवळपास 41 हजार रुपयाचे बक्षीस शाळेतील प्रथम येणाऱ्या मुस्तफा व्हंताळेला अकरा हजार रुपये शाळेतून द्वितीय येणारी माहीम शानेदीवान सात हजार रुपये शाळेतून तृतीय येणारा अभिजीत शेरीकर ला पाच हजार रुपये सर मुलीच प्रथम येणाऱ्या श्रेयशी शिंदेला पाच हजार रुपयाचे बक्षीस मिळाले नेत्रा शेटगार आलम मुल्ला शिफा शेख जैद शेख विठ्ठल पवार त्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले यावेळी अनुसूचित जातीच्या शाळेतील 17 विद्यार्थ्यांना 35 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तर जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेत प्रथम आलेल्या तीन संघांचा सत्कार करण्यात आला .

सेवा संकल्प अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेला आयान कुरेशी कुलसुम उस्ताद पलक वरवटे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावर्षी शाळेचा निकाल उत्कृष्ट लागल्याने प्रशालेतील माध्यमिक शिक्षक बशीर शेख, धनराज तेलंग, विद्यानंद सुत्रावे फजल शेख पूजा गुंडीले या शिक्षकांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे सूत्रसंचालन विद्यानंद सुत्रावे तर आभार सोनाली मुसळे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनराज तेलंग नागेश स्वामी प्रवीण शिंदे सदानंद कुंभार सोनाली मुसळे पूजा गुंडीले राजू सरपे यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail