Best News Portal Development Company In India

उमरग्यात पोलिसांची गांजाविरोधात कारवाई; दीड गुंठ्यातील दीडशे किलो गांजाची झाडे जप्त !

उमरग्यात पोलिसांची गांजाविरोधात कारवाई; दीड गुंठ्यातील दीडशे किलो गांजाची झाडे जप्त !
शिवाजी यंपाळे याच्या शेतातील गांजाची झाडे ताब्यात; रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू

उमरगा / लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा तालुक्यात गांजाच्या बेकायदेशीर लागवडीचे प्रकार समोर येत असतानाच उमरगा पोलिसांनी त्याच गावात हिप्परगाराववाडी येथे दुसऱ्या ठिकाणी कारवाई करत अंदाजे १५० किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत. त्याची अंदाजे किंमत पावणे दोन कोटी इतकी आहे.शिवाजी यंपाळे याने दीड गुंठे क्षेत्रात गांजाची लागवड केल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी संबंधित गांजाची झाडे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यात गांजाची बेकायदेशीर लागवड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. शिवाजी यंपाळे याच्या दीड गुंठे क्षेत्रातील लागवडीतून अंदाजे दीडशे किलो गांजाची झाडे पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणात गांजाचे नेमके वजन, त्याची किंमत आणि पुढील तपासातून समोर येणारे तपशील अधिकृतरीत्या स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, एएसआय प्रदीप ओहळ, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य कोनगूलवार, चालक राजेश वादे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवलिंग घोळसगाव, अनुरुद्ध कावळे, यासीन समूद, नवनाथ भोरे, बळीराम सोनटक्के आणि महेश सावरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

गांजाच्या लागवडीमुळे खळबळ
उमरगा तालुक्यात गांजाच्या लागवडीविरोधात कारवाया होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अंमली पदार्थांची बेकायदेशीर लागवड रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहून अशा प्रकरणांचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
(चौकट) कार्यक्षेत्रातील बिट अमलदार यांना या सर्व गोष्टींची जान नसते काय?
का आपले हात ओले करण्यासाठी मुग गीळुन गप्प बसतात का हा सवाल जनतेला भेडसावत आहे

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india