Best News Portal Development Company In India

तुळजापूर तालुक्यात खळबळ! आपसिंगा शिवारातून साडेचार लाखांचे ट्रॅक्टर चोरीला; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल!

तुळजापूर तालुक्यात खळबळ! आपसिंगा शिवारातून साडेचार लाखांचे ट्रॅक्टर चोरीला; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
तालुक्यातील आपसिंगा शिवारात शेतात उभे केलेले ४,५०,००0 रुपये किमतीचे ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर संतोष सगरे (वय २९ वर्षे, रा. आपसिंगा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्या आपसिंगा शिवारातील शेत गट क्र. ४५६ मधील शेतात त्यांचे हिरव्या रंगाचे ‘जॉन डिअर’ कंपनीचे ट्रॅक्टर (क्र. MH 25 BF 8368) उभे करण्यात आले होते.
​दिनांक ०८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी १८:०० वाजेपासून ते दिनांक ०९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०५:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने हे ट्रॅक्टर चोरून नेले.

​या प्रकरणी शेतकरी शेखर सगरे यांनी दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यावरून पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा पुढील तपास पोलीस करत आहेत. अधीच शेतकरी दुष्काळात संकटात असल्यामुळे त्यातून चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india