Best News Portal Development Company In India

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी शहाजी सोमवंशी यांची निवड!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी शहाजी सोमवंशी यांची निवड!

​’गाव तिथे शाखा, घर तिथे सदस्य’ अभियानासह जलप्रश्नावर तीव्र लढा उभारण्याचा निर्धार.

​तुळजापूर प्रतिनिधी:-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथील शहाजी पांडुरंग सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष घनश्यामभाई चौधरी यांच्या आदेशानुसार ही महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.

​संघटनेतील उल्लेखनीय प्रवास-
​शहाजी सोमवंशी हे २०१६ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सातत्याने सक्रिय आहेत. यादरम्यान त्यांनी शाखाध्यक्ष, तालुका संघटक आणि जिल्हा संघटक अशी विविध पदे जबाबदारीने सांभाळली आहेत. शहापूर येथील गेल्या १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा प्रश्न त्यांनी संघटनेच्या माध्यमातून अवघ्या दोन ते तीन महिन्यांत मार्गी लावला. या संघर्षातूनच त्यांना संघटित लढ्याची खरी ताकद अनुभवता आली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

​पुढील वाटचाल आणि महत्त्वाचे संकल्प
​जिल्ह्यात संघटनेचा विस्तार अधिक मजबूत करण्यासाठी ‘गाव जोडो अभियान’ राबविण्यात येणार असून, ‘गाव तिथे शाखा, घर तिथे सदस्य’ हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय:
​शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र लढा दिला जाईल.

​मराठवाड्याच्या गंभीर पाणीप्रश्नावर एक ऐतिहासिक ‘जलपरिषद’ भरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असा ठाम निर्धार नवयुक्तर जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
​या निवडीबद्दल शेतकरी वर्गातून आणि कार्यकर्त्यांकडून शहाजी सोमवंशी यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात संघटना अधिक आक्रमक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india