Best News Portal Development Company In India

*विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी : प्राचार्य डॉ. संजय अस्वले*

*विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी : प्राचार्य डॉ. संजय अस्वले*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

दि. १५ ऑक्टोबर : चांगली पुस्तके आपल्याला योग्य विचार करायला शिकवतात, तर महान व्यक्तींची चरित्रे वाचल्यामुळे जीवनात प्रेरणा मिळते.

विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर पुस्तके, वर्तमानपत्रे, कथा, कविता आणि चरित्रांचे नियमित वाचन करावे. वाचनामुळे परीक्षेची तयारी चांगली होते, सामान्य ज्ञानात भर पडते तसेच व्यक्तिमत्त्व विकास, विचारशक्ती आणि भाषिक कौशल्ये वृद्धिंगत होतात.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि समाजमाध्यमांचा वापर वाढला असताना विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

पुस्तके ही ज्ञानाची खरी संपत्ती असून नियमित वाचनामुळे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, विचारांना चालना मिळते आणि भाषिक कौशल्यांचा विकास होतो, असे प्राचार्य डॉ. अस्वले यांनी नमूद केले.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन आणि ग्रंथालय भेट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रंथालयात सर्वाधिक वेळ व्यतीत करून वाचनाची आवड जोपासणाऱ्या कु. करुणा सास्तुरे, कु. सुगंधा मरकड आणि कु. संघर्षिता कांबळे या विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध पुस्तकांचे वाचन केले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिठले, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, ग्रंथपाल डॉ. प्रतिभा गायकवाड, ग्रंथालय सल्लागार समितीतील सदस्य,सहाय्यक ग्रंथपाल श्री. एस. एस. जगताप, तसेच ग्रंथालयीन कर्मचारी बी. आर. साठे, व्ही. पी. मोरे, बी. एफ. औरादे, भगवान काळे, जीवन उपासे, प्रकाश सुंटनेरे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. चंद्रसेन करे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. अजित आष्टे यांनी मानले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india