धाराशिवच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी: (RPI) (A)जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के!
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे धाराशिव दौऱ्यादरम्यान हॉटेल पुष्पक पार्क धाराशिव येथे भव्य स्वागत.
तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, दुष्काळग्रस्त जनता आणि बळीराजाला (शेतकऱ्यांना) दिलासा देण्यासाठी आठवले साहेबांनी पुढाकार घ्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच केंद्र व राज्य सरकारकडून धाराशिव जिल्ह्याला जास्तीत जास्त आर्थिक आणि सामाजिक मदत जाहीर करण्यास भाग पाडावे, असे मनोगत जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के यांनी हॉटेल पुष्पक पार्क धाराशिव व्यक्त केले.
या प्रसंगी धाराशिव जिल्ह्यातील बहुसंख्येने पक्षाचे कार्यकर्ते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे लोहारा तालुकाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठवले साहेबांच्या या दौऱ्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकरी व जनतेला केंद्र सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा निर्माण झाली आहे.
दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेला घास हिवाळ्याच्या उंबरठ्यावर असतानाही वाया गेला आहे. त्यामुळे शासनाने कोणत्याही विलंब न करता धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी आर्थिक मदत, कर्जमाफी आणि इतर सवलती द्याव्यात, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याप्रश्नी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट केले.






