Best News Portal Development Company In India

बहुजन हिताय वसतिगृहात बालसंरक्षण कार्यशाळा संपन्न.

*बहुजन हिताय वसतिगृहात बालसंरक्षण कार्यशाळा संपन्न*
——————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड): उमरगा शहरातील गुंजोटी रोड स्थित बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृह येथे विद्यार्थी कर्मचारी यांचे करिता बालसंरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.यां कार्यशाळेंत तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एम एस जमादार यांनी मार्गदर्शन केले.
सध्यकाळात प्रत्येक ठिकाणी बालकाच्या संदर्भात अनुचित घटना घडत असल्याने बालक राक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी आणि पालक व समाज घटकांची
जबाबदारी वाढली आहे. असे मत याप्रसंगी उपस्थित तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती एम एस जमादार यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपला विकास आपल्यालाच करावा लागतो हे करताना आपण शिस्त पालन करुन विविध कला गुण आत्मसात करणे आवश्यक आहे, तसेच आपण बालक आणि किशोर वईन असल्याने आज आपल्या स्वतःच्या रक्षणाची, आहार, व्यायाम, स्वच्छता आरोग्य याची काळजी घ्यावी लागेल. यां बरोबरच त्यांनी *गुड टच बॅड टच* याविषयीची विद्यार्थ्यांनासविस्तर माहिती दिली.
यावेळी वसतिगृह अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत,पाहारेकरी कमलाकर सुरवसे स्वयंपाकी सौं. पद्मिनी सुरवसे हे उपस्थित होते.
प्रारंभी सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेचे जमादार मॅडम यांचे हस्ते झाले विद्यार्थ्यांनी मैत्रीगीत सादर केले, सूत्र संचालन संस्कार पवार १० वि आभार सुबुद्ध शिवशरणे ९ वि यांनी केले या कार्यशाळे पार पाडण्यासाठी करण्यासाठी सागर सास्तुरे ९ वी, शान गायकवाड ९वी, संघर्ष गायकवाड ९ वी विद्यार्थ्यांनी, विजय भोसले १० वी यांनी पुढाकार आणि परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india