नववर्षाच्या पूर्वसंध्येला अवैद्य गावठी कट्टा जप्त :
स्थानिक गुन्हे शाखा धाराशीव पोलीसाची कारवाई
——————————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
धाराशिव जिल्हा अभिलेखावर एका पाहिजे आरोपीकडे तुळजापूर तालुक्यातील कारला गावी त्याच्या राहत्या घरी गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलीसाना मिळाली असता त्यानी संबंधित आरोपी पर्यंत पोहोचून नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त करून त्या आरोपी विरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यानी नववर्षाच्या पूर्वसंध्येला स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलीसाना नियमित अवैद्य धंदे करणारे व अवैद्य रित्या शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्या वरून स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पोलीस पथकाने तुळजापूर येथे गस्त घालण्यास सुरुवात केली असता त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की तुळजापूर तालुक्यातील मौजे कारला येथे धाराशिव अभिलेखावर पाहिजे आरोपी नामे गणेश उर्फ गणेशा जंपाण्या भोसले यांच्याकडे गावठी कट्टा असून तो रात्री चोरी करण्यासाठी जाणार असल्याचे समजले असता पोलीसानी
दि.३०डिसेंबर २o२५ रोजी ठिक ११.४५ वाजल्या दरम्यान कारला येथे त्यांच्या राहत्या घरी पोहोचले असता तो घराच्या पाठीमागे झाडाखाली बसल्याचे त्यांना दिसून आले. पोलीस आपल्याकडे येत आहेत हे पाहून आरोपी गणेशा भोसले हे गावठी कट्टा फेकून तो पळून गेला. पोलिसांनी पंचनामा करून गावठी कट्टा जप्त करून पुढील तपासासाठी नळदुर्ग पोलीस ठाणे येथे दिले व सरकारी फिर्याद देऊन बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे आरोपी गणेशा भोसले यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर ४८९/२५ कलम ३,२५भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात करण्यात आला आहे.
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती खोखर,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,सपोनि सुदर्शन कासार, पोह.शौकत पठाण,पोह.जावेद काझी,पोह.प्रकाश औताडे, पोह.फरहाणा पठाण,म पोह.शोभा बांगर, पोह.रत्नदीप डोंगरे आदी पोलीस पथकाने पार पाडली आहे.






