Best News Portal Development Company In India

तुळजापूर येथील तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा १००% निकाल!

*श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचा इलेमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेचा 100% निकाल*!
————————————–
तुळजापूर लहु घोडके संपादक तुळजाई एक्सप्रेस;
महाराष्ट्र राज्य कला संचालनालय, यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या चित्रकला ग्रेड परीक्षा या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत गुण वाढीसाठी त्याचा लाभ मिळावा यासाठी या परीक्षा शासनामार्फत घेतल्या जातात . परवा झालेल्या चित्रकला ग्रेड परीक्षेत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एलिमेंट्री चित्रकला ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी 100% लागलेला आहे .
एलिमेंट्री परीक्षेसाठी एकूण 32 विद्यार्थी प्रविष्ट होते .उत्तीर्ण विद्यार्थी – 32
Aश्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी -18
B श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी – 14
*इंटरमिजिएट परीक्षेस बसलेले विद्यार्थी -04
उत्तीर्ण विद्यार्थी-04
A श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी – 01
C श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी -03
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री पांचाळ सर, श्रीमती रत्नपारखी मॅडम यांचे संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर यांनी अभिनंदन केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .

सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य घोडके सर यांनी नेहमीच विद्यार्थी आणि त्यांच्या इतर कलागुणांना वाव मिळावा म्हणून पुढाकार घेऊन विद्यालयाचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थ्यासमवेत प्राचार्य यांचेही कौतुक होत आहे.

 

 

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india