खुदावाडी पंचायत समिती गणातून किशोर धुमाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल
———————————————————
नळदुर्ग (एस.के. गायकवाड) :
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून वागदरी तालुका तुळजापूर येथील किशोर पांडुरंग धुमाळ उर्फ कुशाबा यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
किशोर धुमाळ हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार राणा दादा यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे कार्य निष्ठेने करतात.भारतीय जनना पक्षाने राबविलेल्या विविध उपक्रमामध्ये ते सक्रिय असतात त्यांनी पक्षाची सदस्य नोंदणी अभियानामध्ये अडीचशे हुन अधिक सदस्यांची नोंदणी केली आहे.वेळोवेळी होणाऱ्या पक्षाच्या बैठका,कार्यक्रम यामध्ये ते सक्रीय असतात.आपल्या परिसरातील गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या आमदार राणा दादा पाटील साहेब यांच्या पर्यंत पोहोचून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. गावोगावी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.ते प्रत्यक्ष सामान्य जनतेपर्यंत जाऊन त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देतात.त्यामुळे जनमानसात त्यांची एक चांगली प्रतिमा आहे. भाजपा नंदगाव जि. प. गटप्रमुख तथा तुळजापूर मार्केट कमिटीचे सदस्य सिद्धू अण्णा कोरे,भिवाजी इंगोले, विवेकानंद मिलगीरी,महादेव सालगे,अंगद जाधव आधी जेष्ठ कार्यकर्त्यांच्या समवेत पक्ष बांधणीचे काम प्रामाणिकपणे करतात त्यामुळे एकूणच त्यांच्या कार्याचा विचार करून पक्षश्रेष्ठीने किशोर धुमाळ यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे. याबाबत किशोर धुमाळ यांना भ्रमन ध्वनीवरून विचारले असता ते म्हणाले की माझ्यासाठी पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा अंतिम असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो मान्य करून भाजपा बरोबरच एकनिष्ठ राहणार असे ते म्हणाले.






