गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब तर्फे 22 जानेवारीला गणेश जयंती उत्सवानिमित्त सहस्त्र आवर्तन गणेश याग व महाप्रसादाचे आयोजन — प्रशांत ढाळे
अविनाश जोशी/ करमाळा
गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने याही वर्षी गणेश जयंती उत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी करमाळा शहरातील वेताळ पेठ येथे मोठ्या भक्ती भावात व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती क्लबचे अध्यक्ष नगरसेवक प्रशांत ढाळे यांनी दिली. गणेश जयंती निमित्त सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून होम हवन सहस्त्र आवर्तन गणेश याग असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून करमाळा शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असून या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात शहरातील नागरिक एकत्र येऊन मोठ्या भक्ती भावाने हा उत्सव साजरा करतात हेच या उत्सवाचे वैशिष्ट्य असल्याचे नगरसेवक प्रशांत ढाळे यांनी सांगितले करमाळा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेश जयंती उत्सव व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे






