तुळजापूर ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई : माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांची फॉर्च्युनर गाडी जप्तीमुक्त करण्यात आली.
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर शहरात चर्चेत असलेल्या ड्रग्स प्रकरणात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बापू कणे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धाराशिव च्या विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करत कणे यांची फॉर्च्युनर गाडी जप्तीतून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत, फक्त साक्षीदाराच्या जवाबाचा आधारावर ही गाडी जप्तीची कारवाई करण्यात आली होती असे निरीक्षण मा. न्यायालयाने नोंदवले आहे . या निर्णयामुळे शहरातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.तामलवाडी पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारी २०२५ रोजी दाखल झालेल्या ड्रग्स प्रकरणात ही फॉर्च्युनर गाडी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर वाहन सोडण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज करण्यात आला; मात्र तो अर्ज विशेष न्यायालयात फेटाळण्यात आला. या आदेशाविरोधात मा. उच्च न्यायालयात पुनरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता, या प्रकरणात तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांना शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिले तसे शपथपत्र देखील दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अर्जदाराच्या वतीने ॲड. नितीन सुरेश साळुंके यांनी प्रभावी युक्तिवाद केला. वाहनाचा गुन्ह्याशी थेट संबंध नसल्याचे आणि फक्त साक्षीदाराच्या जवाबाचा आधार घेऊन गाडी जप्त करणे, विशेष न्यायालयात कायदेशीर बाबींचा विचार न करता अर्ज फेटाळण्यात आल्याचे , अशे अनेक ठोस मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले. त्यांच्या सशक्त कायदेशीर मांडणीची दखल घेत न्यायमूर्ती श्री.अभय एस. वाघवसे यांनी विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करत वाहन सोडण्याचे स्पष्ट आदेश दिले.उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे चंद्रकांत कणे यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला असून, प्रकरणाला नवे वळण मिळाल्याचे बोलले जात आहे या आदेशानंतर माजी नगराध्यक्ष कने यांनी मा. उच्च न्यायालयाचे आभार मानून त्यांना न्याया व्यवस्थे वर विश्वास आहे असे मत व्यक्त केले आहे, या प्रकरणात ॲड. नितीन सुरेश साळुंके यांनी युक्तिवाद केला त्यांना सहकार्य ॲड. कृष्णा सोळंके यांनी केले . न्यायालयीन आदेशानंतर तुळजापूरमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.






