Best News Portal Development Company In India

नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एनसीसी विद्यार्थ्यांच्य पथसंचलनाचे प्रभावी सादरीकरण संपन्न!

नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात एनसीसी विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाचे प्रभावी सादरीकरण संपन्न
————————————————–
नळदुर्ग (एस. के.गायकवाड):
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्ग ता.तुळजापूर संचलित नळदुर्ग येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील एनसीसी (NCC) च्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या प्रांगणात सादर केले सुंदर आकर्षक आणि प्रभावी विशेष पथसंचलन.
येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने कॉलेजचे
प्राचार्य डॉ.सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तर बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी कॅबीनेट मंत्री नामदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२४ जानेवारी २o२६ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयाच्या प्रांगणात विशेष पथसंचलनाचे सादरीकरण केले.
एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट अतिश एस. तिडके यानी अत्यंत परिश्रम करून येथील एनसीसी विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतली होती दिनांक २४ जानेवारी २o२६ रोजी सकाळी १०.३० वा.सुमारास या पतसंस्थेला सुरुवात करण्यात आली आपल्या ड्रेस कोड मध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रभावशाली पथसंचलन सादर केले.कॉलेजच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे मोठे पथसंचालनाचे सादरीकरण यावर्षी करण्यात आले.
या पथसंंचलनाने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या वेळी कॉलेजचे वातावरण सैनिकीयमय झाले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एनसीसी मध्ये विविध उपक्रमात प्राविण्यपर पारितोषिक पटकाविलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदार मधुकरराव चव्हाण यानी या पथसंचलनात सहभागी झालेल्या सर्व एनसीसी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुभाष राठोड,एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट अतिश एस.तिडके आदींचे विशेष अभिनंदन केले.
या प्रसंगी कॉलेजचे संचालक माजी नगराध्यक्ष शहबाज काझी,माजी नगरसेवक संजय बताले, मुस्ताक भाई कुरेशी, माजी प्राचार्य डॉ.मोहन बाबरे, परिवर्तन सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव तथा कॉलेजचे माजी विद्यार्थी मारुती बनसोडे सह आजी माजी विद्यार्थी पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india