वागदरी ग्रामस्थांच्या वतीने दिवंगत अजित दादा पवार यांना श्रद्धांजली
—————————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राजकीय चळवळीतील एक धाडसी आणि रांगडं नेतृत्व दिवंगत अजित दादा पवार यांच्या अकाली दुःखद निधनाबद्दल वागदरी तालुका तुळजापूर येथे महायुतीसह गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राजकीय चळवळीतील एक अनुभवी आणि धाडसी नेतृत्व सर्वसामान्य जनतेला सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्यायिक भावनेतून न्याय देणारे राजकारणातील आदरयुक्त दादा नामदार अजित दादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २o२६ रोजी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाले.त्यांच्या या अनपेक्षित दुःखद निधनाबद्दल वागदरी येथील सर्वपक्षीय तमाम ग्रामस्थांच्या वतीने गावातील मुख्य चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते अमोल पाटील, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख किशोर धुमाळ प्राध्यापक गणेश बिराजदार आदीनी शब्दसुमनाने समस्त ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली.यानंतर उपस्थित सर्वांनी आपापल्या जागेवर दोन मिनिट शांत उभे राहून आपल्या लाडक्या नेतृत्वाला श्रद्धांजली वाहिली.या प्रसंगी ज्ञानेश्वर पाटील, किशोर धुमाळ, मदन पाटील, दत्ता सुरवसे, ज्ञानोबा सुखसे, आपा मिटकर नामदेव यादव पंकज सुरवसे रामसिंग चव्हाण भालचंद्र यादव,दत्तात्रय पाटील,चरणसिंग परिहार मोहनसिंग दादा चव्हाण सह गावातील सर्वपक्षिय कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.






