Best News Portal Development Company In India

काक्रंबा जिल्हा परिषद गटात रि.पा.ई (आठवले) चा ठाकरे सेनेला पाठिंबा

काक्रंबा जिल्हा परिषद गटात रिपाइं (आठवले )चा ठाकरे सेनेला पाठिंबा.
——————————————–
नळदुर्ग ( एस.के. गायकवाड ) :
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गटात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाने शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अँड.रामचंद्र ढवळे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जातीसाठी राखीव असून या जिल्हा परिषद गटातून शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अँड. रामचंद्र ढवळे हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने जाहीर पाठिंबाचे पत्र देण्यात आले असून त्या पत्रात म्हटले आहे की भाजपाने मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना कसल्याही प्रकारे सन्मानाने सामावून न घेतल्यामुळे सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यामुळे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )कार्यकर्त्यानी काक्रंबा जि.प. गटात शिव सेना (उबाटा) पक्षाकडून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित असलेले आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अँड.रामचंद्र ढवळे यांना पाठिंबा देण्यात येत आहे.या प्रसंगी रिपाइ (आठवले)चे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पांडागळे, रिपाइं जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के जिल्हा उपाध्यक्ष प्रताप कदम जिल्हा सचिव तानाजी उमाजी कदम तुळजापूर शहर अध्यक्ष वैजनाथ पांडागळे युवा जिल्हा उपाध्यक्ष धम्मशिल कदम सह कार्यकर्ते उपस्थित होते

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india