Best News Portal Development Company In India

ब्रेकिंग न्यूज :- मंगळवार नाही आता बुधवार नागरिकांनी याची नोंद घ्यावी : तुळजापूरचा आठवडा बाजार आता थेट बुधवारी भरणार!

मंगळवार नाही आता बुधवार याची नागरिकांनी नोंद घ्यावी : तुळजापूरचा आठवडा बाजार आता थेट बुधवारी भरणार!

तुळजापूर प्रतिनिधी : शहरातील आठवडा बाजाराच्या दिवशी मोठा बदल करण्यात आला असून, आतापर्यंत मंगळवारी भरणारा बाजार आता बुधवारी भरणार आहे. नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, दि. ११ फेब्रुवारी २०२६ पासून मंगळवार ऐवजी बुधवारी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे.तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी शहरात दाखल होत असतात. यामुळे मंगळवारी बाजार आणि भाविकांची गर्दी एकत्र येऊन वाहतूक कोंडी, गोंधळ आणि गैरसोयीचे चित्र निर्माण होत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन नागरिक, व्यापारी आणि भाविकांच्या सोयीसाठी हा बदल करण्यात आल्याची माहिती युवा मोर्चा जिल्हा उपप्रमुख राजेश्वर कदम यांनी दिली.
नवीन वेळापत्रकामुळे बाजारात अधिक शिस्त, नियोजन आणि सुव्यवस्था राहील, तसेच व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी अधिक अनुकूल वातावरण मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थापनही सुकर होणार असून, भाविकांची गैरसोय टळेल, अशी अपेक्षा आहे.दरम्यान, नागरिक व व्यापाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि मंगळवार ऐवजी बुधवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india