Best News Portal Development Company In India

किल्लारी येथे आयोजित पाचव्य विशाल बौद्ध धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे: भदंत धम्मसार थेरो यांचे आवाहन!

किल्लारी येथे आयोजित पाचव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे : भदंत धम्मसार थेरो यांचे आवाहन
—————————————————-
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड) :
किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथे तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी २o२६ रोजी सकाळी ठिक १o.oo वा. ते सायंकाळी ठिक ६.oo वा.दरम्यान पाचव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या बौद्ध धम्म परिषदेस लातूर व धाराशिव जिल्ह्यातील तमाम श्रध्दासंपन्न बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक पूज्य भदंत धम्मसार थेरो यांनी केले आहे.
. बौद्ध धर्म हा मानवतेची शिकवण देणारा असून या धम्मात कर्माला फार महत्व आहे.बौद्ध धम्माचा विचार हा मानवतेचा विचार आहे हा मानवतेच्या समतेच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि संबंध मानव जातीकडून बौद्ध धर्माच्या विचारांचे आचरण व्हावे या उद्देशाने बौद्ध धम्माच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी किल्लारी येथील तक्षशिला बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये दरवर्षी विशाल बौध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते.याही वर्षी गुरवार दिनांक २६ फेब्रुवारी २o२६ रोजी धम्मगुरु पूज्य भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिकू संघ बुद्ध गया यांच्या अध्यक्षतेखाली तर देशाचे सामाजिक न्याय व अधिकारता राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले व औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचव्या विशाल बौद्ध धर्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या धम्म परिषदेस लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिकेने व बौद्ध बांधवांनी,आंबेडकरी अनुयायांनी तक्षशिला बुद्ध विहार तथागत बुद्ध गार्डन ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे किल्लारी या ठिकाणी . मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पूज्य भदंत धम्मसार थेरो यांनी नळदुर्ग येथे या धम्म परिषदेच्या प्रसार आणि प्रचारादरम्यान दौऱ्यावरआले असता उपसकाशी बोलताना केले.
. तुळजाई एक्सप्रेस साठी
. एस. के. गायकवाड नळदुर्ग तुळजापूर

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india