शिवजयंती निमित्ताने आयोजित शिव सप्ताहात रक्तदान शिबिर संपन्न : उत्स्फूर्तपणे रक्तदात्यांनी केले रक्तदान.
—————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड) :
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिव सप्ताहाच्या पाचव्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरात अत्यंत उत्स्फूर्तपणे रक्तदात्यांनी रक्तदान केले.
. शिव -बसव-राणा व श्री संत काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी तालुका तुळजापूर च्या वतीने वागदरी येथे दि.१३ फेब्रुवारी २o२६ पासून शिव जयंती निमित्ताने शिव सप्ताहास प्रारंभ करण्यात आले असून या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी दिनांक १७ फेब्रुवारी २o२६ रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रताप,व श्री संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.यावेळ पत्रकार किशोर धुमाळ, शिवजन्मोत्सव समितीचे सदस्य व किशोर धुमाळ यांचे चिरंजीव श्रीकार धुमाळ व युवा शेतकरी नागनाथ चव्हाण यांच्या पासून रक्तदानाला सुरुवात झाली. हळूहळू या रक्तदान शिबिरास प्रतिसाद वाढत गेला आणि एकूण ४o रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकीची दबाबदारी पार पाडली.
या शिबराये संपूर्ण कामकाज सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूरचे प्रमुख डॉ.योगेश कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.हरिशचंद्र गलियाल,धनश्री गुट्टे,वनिता गवणी,गेनसिद्ध चाबुकस्वार,सचिन कौंच आदींनी पाहिले. या .वेळी या शिवसप्ताहाचे मुख्या प्रवर्तक अँड. अमोल पाटील सह जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.






