Best News Portal Development Company In India

जिल्हा परिषद निवडणूक नेत्याला गुलाल लावल्याशिवाय पायात चप्पल न घालणारा अवलिया ; नंदगाव चे संजय पाटील!

जिल्हा परिषद निवडणूकीत नेत्याला गुलाल लागल्याशिवाय पायात चप्पल न घालणारा नंदगावचा अवलिया संजय पाटील
—————————————————-
नळदुर्ग .(एस. के.गायकवाड)
नुकतेच पार पडलेल्या
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपापल्या परीने आपल्या नेताला कशा पद्धतीने निवडून आणता येईल यासाठी पराकाष्ठा करून मेहनत करत होते.प्रत्येक कार्यकर्ता हा आपलाच नेता विजयी झाला पाहिजे हि भावना मनात ठेवून प्रचारार्थ उतरला होता.
अनेकांनी सोशल मीडियावर विजयी भव फिक्स निवडून येणार.. आम्हीच गुलाल उधळणार.. अशा अनेक पोस्ट रिल अपलोड करत हैदोस घातलेल आपण पाहिलं.नेत्यांसाठी कुणी पैज लावत होतं कुणी नवस पण करत होतं.अनेकांनी अनेक दावे करत अपापल्या नेत्यांवरची निष्ठा दाखवली.असाच काहि घडलं ते तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटात येथील महायुती चे उमेदवार सिध्देश्वर कोरे निवडणूकीत विजयी होऊन गुलाल लागल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा पण केलेला अवलिया पाहावयास मिळाला. कोरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय पाटील हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत गुलाल लागल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही.असा निर्धार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दर्शन घेऊन केलो होता‌.
त्यांनी निवडणूकीत संपूर्ण प्रचार चप्पल न घालता अनवाणी पायाने फिरत तब्बल २५ दिवस जिल्हा परिषद गट पिंजून काढला.कार्यकर्त्यांचा पाठबळवर आणि जनमतामुळे कोरे यांना घवघवीत यश मिळाले.आणि कार्यकर्त्याला स्वतः हाताने चप्पल पायात घालले.नेत्यावर निष्ठा दाखवणाऱ्या या अवलियाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india