Best News Portal Development Company In India

शिवजयंती निमित्ताने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केले शिवरायांना अभिवादन!

शिवजयंती निमित्ताने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केले शिवरायांना अभिवादन
—————————————————
नळदुर्ग (प्रतिनिधी ):
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी शिवरायांना मनोभावे अभिवादन केले.
. दि.१९ फेब्रुवारी २o२६ रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वरुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्य कार्यकर्त्यांनी अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करित शिव जयंती साजरी केली.याप्रसंगी रिपाइं आठवले
चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मस्के,रिपाइं ओबीसी आघाडीचे तुळजापूर शहराध्यक्ष तथा तुळजाई एक्सप्रेस चॅनलचे मुख्य संपादक लहु घोडके,रिपाइं चे किसन पांडागळे, मनोजा भैया दांडे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india