Best News Portal Development Company In India

जनक्रांती पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री राजीव पुजारी यांची निवड !

जनक्रांती पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी राजीव पुजारी यांची निवड

सोलापूर : जनक्रांती पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी रुपाभवानी मंदिराचे प्रमुख पुजारी व मानकरी श्री.राजीव पुजारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारिता आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रात त्यांचा असलेला सक्रिय सहभाग लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती जनक्रांती पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष विष्णु कारमपुरी यांच्या हस्ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.राजीव पुजारी हे अध्यात्मिक आणि सामाजिक कार्यात सातत्याने कार्यरत असून सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिराचे ते श्रद्धास्थान असलेले पुजारी आहेत. समाजातील विविध प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक व मार्गदर्शक राहिली आहे. आता पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांसाठी तसेच सत्य, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेला बळ देण्यासाठी ते कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या वेळी जनक्रांती पत्रकार संघाचे संस्थापक प्रसाद जगताप, श्रीशैल वाघमोडे , रेखाताई अडकी, श्रीनिवास बोगा, पप्पु शेख व गुरुनाथ कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी राजीव पुजारी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, समाजातील सामान्य घटकांचे प्रश्न शासन-प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करत असतात. या क्षेत्रात संघटनेच्या माध्यमातून अधिक संघटित, प्रभावी आणि जबाबदार कार्य घडवून आणण्याचा मानस राजीव पुजारी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यातील पत्रकार संघटनेच्या कार्याला नवी दिशा व बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india