Best News Portal Development Company In India

नळदुर्ग चे सुपुत्र प्राध्यापक राजा सोनकांबळे राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्काराने सन्मानित!

.नळदुर्ग चे सुपुत्र प्रा.राजा सोनकांबळे राष्ट्रीय शिक्षणसेवा पुरस्काराने सन्मानित
—————————————————-
नळदुर्ग ( एस.के .गायकवाड ) :
नळदुर्ग ता. तुळजापूर येथील सुपुत्र व सध्या एस.एन डी.टी. विद्यालय नारायण पेठ पुणे येथे कनिष्ठ प्राध्यापक म्हणून सेवेत कार्यरत असलेले प्रा.राजा रेवाप्पा सोनकांबळे यांना काव्यमित्र संस्था पुणे यांच्या मार्फत दिला जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण सेवा पुरस्काराने शिव जयंती व राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीचे औचित्य साधून पिंपरी पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व स्वच्छतेचे दूत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्ताने काव्यमित्र संस्था पुणे चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र विमलाई श्रीमंत सगर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १९ फेब्रुवारी २o२६ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथिल सायन्स पार्क येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यअध्यक्ष विस्ताराधिकारी पंचायत संघटना व्हि. जे. वाघमारे हे होते तर प्रमुख म्हणून मातृतीर्थ सिंदखेडराजा राजे लखोजी जाधवराव यांचे चौदावे वंशज संभाजी राजे जाधवराव व संत साहित्याचे गाढे अभ्यासक विजय बोत्रे (पाटील) हे होते. या प्रसंगी काव्यमित्र शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या प्रसंगी एस.एन.डी.टी. महिला विद्यालय पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले प्रा.राजा सोनकांबळे यांना संभाजीराजे जाधव व विजय बोत्रे (पाटील ) यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षणसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
. या प्रसंगी काव्यमित्र संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय जगताप, सचिव हरीनाथ कांबळे सह सर्व काव्यमित्र संस्थे विश्वस्थ, निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबदल मित्र परिवारांनी त्यांचे आभिनंदनी केले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india