Best News Portal Development Company In India

संत निरंकारी मिशनच्या वतीने संगोबा परिसराची व नदीपात्राची स्वच्छता!

*संत निरंकारी मिशनच्या वतीने संगोबा परिसराची व नदीपात्राची स्वच्छता*
अविनाश जोशी/करमाळा
सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असिम कृपेने
सदगुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभरात अमृत प्रकल्पा अंतर्गत ‘स्वच्छ जल स्वच्छ मन ‘ च्या माध्यमातून नदी स्वच्छ जल अभियान राबविण्यात आले .
संत निरंकारी मंडळ करमाळा ब्रँचच्या वतीने करमाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र संगोबा मंदिराचा अंतर्बाह्य परिसर तसेच सिना नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली .
श्रीक्षेत्र संगोबाची महाशिवरात्रीला मोठी यात्रा ही भरते . त्यामुळे परिसर व नदीचे पात्र प्रदुषीत होते . प्रदूषण अंदर हो या बाहर दोनोही हानिकारक होता है
संत निरंकारी मिशनच्या वतीने संपूर्ण भारतात १६०० पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळेस नदीपात्र किंवा लोकोपयोगी पाण्याचे तलाव येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले . सदगुरू बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या सत्प्रेरणेने सन २०२३ पासून अमृत जल प्रोजेक्ट संत निरंकारी मिशन व भारत सरकारच्या संयुक्त विचार प्रणालीतून सर्व मानवोपयोगी हे देशव्यापी स्वच्छता अभियान ‘नरसेवा नारायण पूजा ‘ या उक्तीप्रमाणे मोठ्या श्रध्देने राबवले जाते.
संत निरंकारी मिशनच्या वतीने प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात वृक्षारोपण अभियान ,रक्तदान शिबीर, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य व स्वच्छता अभियान ह्या संपूर्ण मानवतेसाठी उपक्रम निष्काम भावनेने राबवले जातात .
श्रीक्षेत्र संगोबा मंदिराचा अंतर्बाह्य परिसर व सिना नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी लहान बालगोपाळासह करमाळा , जातेगाव , कामोणे, पोटेगाव , पांगरे , नेरले , निंभोरे , शेलगाव , उमरड , वाशिंबे , चिखलठाण , दहिगाव , केतूर , जवळा ,केडगाव या ठिकाणाहून २०० महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला.
हे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे ब्रँचमुखी पोपट थोरात, सेवादल अधिकारी रमेश वारे , भैरू वळेकर, वैशाली सरडे , यांच्या समवेत सर्व महिला व पुरुष सेवादल , तसेच आत्माराम वायकुळे. डॉ. भाऊसो सरडे , मुकुंद साळूंके ,अंगद पडवळे , बप्पा धडस , तानाजी चव्हाण . मोहन चोरमले , योगेश चव्हाण , इन्नूस शेख , राजेंद्र भुजबळ, दादा आव्हाड , शिवाजी हजारे , राजू कारंडे या सर्वांनी परिश्रम घेतले .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india