Best News Portal Development Company In India

लोहारा- पाटोदा रस्ता तत्काळ सुरू करा अन्यथा ; आंदोलनाचा इशारा!

लोहारा–पाटोदा रस्ता तात्काळ दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
तुळजापूर प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) लोहारा तालुक्याच्या वतीने लोहारा–पाटोदा रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी, धाराशिव यांना निवेदन देण्यात आले आहे. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लोहारा ते पाटोदा या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहन चालवावे लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
या रस्त्याचे काम बालाजी कन्स्ट्रक्शन उमरगा यांच्याकडे असून दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी काम सुरू करण्याबाबत नोटीस दिली होती. मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच स्थानिक संयोजन समितीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून पुढील दहा दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर लोहारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष काकासाहेब भंडारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे जिल्हा चिटणीस दिगंबर कांबळे, आर. पी. आय. चे तालुका उपाध्यक्ष बालाजी माटे, कार्याध्यक्ष गजेंद्र डावरे तसेच इतर कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india