सावधान तुळजापुरात वाढती गुन्हेगारी “अवैध गावठी कट्टा जप्त.”स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव पोलिसांची कारवाई.”
तुळजापूर प्रतिनिधी : मा. पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस नववर्षाच्या पुर्वसंध्ये निमीत्त अवैध धंदे करणारे, तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसम यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेशीत केले होते. स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेचे सपोनि अमोल मोरे, सचिन खटके व पथक गस्त करीत तुळजापूर येथे आल्यानंतर त्यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की धाराशिव आरोपी नामे विनोद उर्फ लाल्या बंडु हुच्चे-गवळी रा. तुळजापूर याच्याकडे गावठी कट्टा असून तो बुलेट मोटरसायकल सह सध्याहडको मैदान तुळजापूर येथे मैदानात थांबलेला असुन अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पथकाने दि.27.02.2026 रोजी 21.50 वा. सदर ठिकाणी गेले असता मिळालेल्या बातमी प्रमाणे नमूद आरोपी हडको मैदानात थांबलेला दिसला पथकाने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव विनोद उर्फ लाल्या बंडु हुच्चे-गवळी, वय 21 वर्षे, रा. आर्या चौक, तुळजापूर जि. धाराशिव असे सागिंतले. त्यास नमुद मिळालेल्या माहिती बद्दल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतील असता त्याचे ताब्यात कंबरेला खवलेला एक गावठी कट्टा व त्याचे चेंबरमध्ये एक जिवंत काडतुस मिळुन आले. पोलिसांनी पंचनामा करून नमूद गावठी कट्टा एकुण 25,500₹ किंमतीचा सह एक रॉयल इनफिल्डळाटर कंपनीची बुलेट क्र एमएच25 बीडी0407 असा एकुण 2,60,500₹ किंमतीचा माल जप्त करून सदर आरोपीच्या विरोधात पोस्टे तुळजापूर कलम 3, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास चालू आहे. जप्त करण्यात आलेला गावठी कट्टा पुढील कारवाई कामी पोस्टे तुळजापूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री विनोद इज्जपवार, सपोनि श्री. अमोल मोरे, सचिन खटके, पोह/530 निंबाळकर, पोह/1479 जाधवर, पोह/1569 चव्हाण, पोह/1451 शिंदे, पोह/199 राठोड पोना/ 1611 जाधवर, चापोह/1248अरब, चापोकॉ/693 दहीहंडे यांनी केली आहे. श्री तुळजाभवानी च्या पावन नगरीत वाढती गुन्हेगारी पाहता पोलिसांनी सतर्क होऊन योग्य ती कारवाई करावी व गुन्हेगारीला नाहीसी करावी अशी सर्वसामान्य तुळजापूरच्या नागरिकांची इच्छा आहे






