Best News Portal Development Company In India

नळदुर्ग येथे राज्य परिवहन महामंडळातील मान्यवर कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न !

नळदुर्ग येथे राज्य परिवहन महामंडळातील मान्यवर कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न
——————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत नळदुर्ग बस स्थानकाचा धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या मान्यवर कर्मचाऱ्यांचा नळदुर्ग ता.तुळजापूर येथे सत्कार करण्यात आला.
. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर राबविण्यात आलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत नळदुर्ग बस स्थानकाचा धाराशिव जिल्ह्यात स्वच्छेच्या बाबतीत प्रथम क्रमांक आल्या बद्दल संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देवसिंगा (तुळ ) ता. तुळजापूर च्या वतीने नळदुर्ग बसस्थानकात राज्य परिवहन महामंडळाचे कार्यरत असलेले कर्मचारी मान्यवर वाहतूक नियंत्रक महेश मनोहर डुकरे, दुसरे वाहतूक नियंत्रक अनिल महादेव हांडे,तात्पुरते वाहतूक नियंत्रक गुंडाप्पा माणिक डुकरे व स्वच्छता कर्मचारी अर्थात स्वच्छता दूत लहू पांडुरंग देडे यांचा फेटा पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.प्रारंभी लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले तर सूत्रसंचलन रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन शिवसेना नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले यांनी केले.
यावेळी रिपाइं (आठवले) चे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते अशफाक जमादार,आकाश हराळकर, कुणाल बेले,दानिश जमादार, खभूमअली जमादार,आयान जमादार सहप्रवासी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा स्वयंसेवी संस्था देवसिंगा (तुळ )संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन रिपाइं (आठवले )चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले व आभार प्रदर्शन शिवसेना शहर प्रमुख संतोष पदाले यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india